• +91 9890969315
  • savalee2008@gmail.com
  • savalee

    Help & Support

    Home > Help & Support

    Online Donation

    India Payment


    आपल्या परिसरातील निराधार, वंचित मुलं व महिला यांच्या समृद्ध आत्मिक विकासासाठी त्यांचा आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर करणे व या माध्यमातून एक शांतीप्रिय, विकसित व समृद्ध समाज घडविणे या उद्देशाने २००१ साली, संकल्प प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने ‘सावली – मुलांचे हक्काचे घर’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. गत १८ वर्षात सुमारे पाचशेहून अधिक निराधार, आईवडील गमाविलेल्या मुला-मुलींना ‘सावली’ने समता, बंधुता, चारित्र्य आणि सौहार्द्र याच्या संस्कारांबरोबरच स्वत:च्या हक्काच्या घराची ऊब दिली आहे. या पाचशेपैकी चारशेहून अधिक मुलांचे त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन झाले, पन्नासहून अधिक मुलं स्वावलंबी झाले तर १४ मुलींचे विवाह संपन्न झाले. ‘सावली’ परिवारास सुमारे २००० कुटुंबे जोडली गेली असून या कुटुंबांमध्ये मुलांच्या मुलभूत अधिकाराबद्दल जाणीव जागृती होऊन त्याविषयीची समज दृढ झाली आहे.

    एक संवेदनशील, सुशिक्षित, सुसंस्कारित तथा शांतीप्रिय समाज घडविण्याच्या या उपक्रमात आपले योगदान देऊन आपला सहभाग नोंदवण्यासाठी खालीलपैकी आपल्या सोयीचा कुठलाही आर्थिक मदतीचा पर्याय आपण निवडू शकता

    मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एका मुलाच्या एका महिन्याचा छंदवर्गाचे शुल्क रु. ५०० मात्र
    सावलीमधील वाचनालय व इतर व्यक्तिमत्व विकासासाठी चालणाऱ्या उपक्रमांचे मासिक शुल्क रु. १,००० मात्र
    एका मुलाच्या एका महिन्याच्या भोजनादी सर्व व्यवस्थांचे पालकत्व शुल्क रु. २,००० मात्र
    आपल्या प्रियजनांच्या वाढदिवस अथवा स्मृतिदिनानिमित्त सावलीस एका दिवसाचे अन्नदान शुल्क रु. ३,००० मात्र
    सावलीच्या दैनंदिन गरजा, जसे की – कपडे, तेल, साबण, इत्यादी वस्तूंचे एका महिन्याचे शुल्क रु. ५,००० मात्र
    एका मुलाच्या, शाळेच्या फी व्यतिरिक्त, सर्व शाळासंबंधी वस्तूंचे एका वर्षाचे शैक्षणिक पालकत्व रु. ७,००० मात्र
    सावलीच्या विशिष्ट महत्वाच्या स्थळांना भेटी देण्याच्या वार्षिक सहलींचे एका वर्षाचे शुल्क रु. १०,००० मात्र
    सावलीच्या एका वर्षाच्या संपूर्ण व्यवस्थापन खर्चाच्या १% व्यवस्थापन शुल्काप्रती रु. १५,००० मात्र
    एका मुलाच्या एका वर्षाच्या सर्व प्रकारच्या एकत्रित खर्चाचे संपूर्ण वर्षाचे पालकत्व शुल्क रु. ३०,००० मात्र
    या व्यतिरिक्त सावलीच्या मासिक १.२५ लाख व वार्षिक १५ लाख खर्चासाठी आपल्याला शक्य असेल ती रक्कम*

     


    It was the 5th of January 2001, when we founded Savalee Balsadan led by Sankalp Pratishthan Ahmednagar (under Social Act 1860/Regi. Maha. / 551 and 1950 F 6426 Mumbai Public Trust) with only 3 children. Then, in the month of May 2007, we shifted to an improved place at Bhushan Nagar, Kedgaon, Ahmednagar.

    Recent Post

    Our Impact

    Contact Us

  • Bhushannagar, Kedgaon,
    Ahmednagar, Maharashtra - 414005
  • +91 9890969315
  • savalee2008@gmail.com

  • Follow us

    2020 AllRights Reserved by www.savalee.org